पत्नीला गोळ्या झाडल्यानंतर पतीचा ऑडीओ व्हायरल, ग्वालियर येथील नंदिनी हत्याकांड
ग्वालियर शहरातील नंदिनी हत्याकांडात सतत नव-नवीन खुलासे होत आहेत. आता या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण आले आहे. सोशल मीडियावर नंदिनी आणि तिच्या पती अरविंद सिंह परिहार यांच्यात फोनवर झालेल्या कथित संभाषणाचा एक ऑडिओ व्हायरल होत आहे. ज्याने संपूर्ण प्रकरणात नवीन वळण आले आहे.
.ग्वालियर मधील नंदिनी हत्याकांडाबाबत तिच्या पतीचा ऑडिओ समोर आला आहे.समोर आलेल्या ऑडीओबाबत दावा केला जात आहे की हा हत्याकांडापूर्वीच्या वादादरम्यान झालेल्या भांडणाचा आहे. पण TV9 या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. नंदिनी आणि आरोपी पती अरविंद परिहार यांच्यातील संभाषणाचा ऑडिओ ऐकून कोणालाही सहज अंदाज येऊ शकतो की पती-पत्नींमधील परस्परी वाद आणि तणाव कोणत्या पातळीला जाऊन पोहोचला होता.
मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये झालेल्या नंदिनी हत्याकांडाने सर्वांनाच हादरवून टाकले आहे. पती अरविंद परिहारने नंदिनीवर भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या केली.नंदिनीचे कोणासोबत तरी अफेअर सुरु आहे असा संशय अरविंदला येत होता. पत्नीला गोळ्या झाडल्यानंतर फेसबुक लाइव्हमध्येही अरविंद याच गोष्टीचे सांगत राहिला की नंदिनी मला फसवत होती. यात त्याने दोन लोकांची नावेही घेतली. या दोन व्यक्तींवर अरविंदला शंका होती. आता या प्रकरणात आणखी एक नवा ऑडिओ समोर आला आहे. या ऑडीओमध्ये अरविंद स्पष्टपणे म्हणतो की होय मी पूजासाठी तुला फसवले आहे.
समोर आलेल्या ऑडीओबाबत दावा केला जात आहे की हा हत्याकांडापूर्वीच्या वादादरम्यान झालेल्या भांडणाचा आहे. पण हा ऑडिओ खरा आहे की खोटा याबाबत आम्ही ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. पण नंदिनी आणि आरोपी पती अरविंद परिहार यांच्यातील संभाषणाचा ऑडिओ ऐकून पती-पत्नींमधील वाद आणि तणाव कोणत्या पातळीला जाऊन पोहोचला होता. मात्र अशा पद्धतीने अमानुषपणे आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त होते.
